नागपूर – दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठे नुकसान हा अदृश्य हात करीत आहे, असे विधान सुप्रिया सुळे यांनी येथे केले. त्या नागपूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे नुकसान केले आहे.
हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी ६१ पैसे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप
भाजपाकडून ‘आईस’ वापर
सुळे यानी भाजपावर आरोप करताना ‘आईस’ शब्द वापरला. आय म्हणजे इनकम टॅक्स, सी म्हणजे सीबीआय आणि ई म्हणजे ईडी, असे त्या म्हणाल्या. याचा वापर भाजपा पक्षफोडी करते, असा आरोप त्यांनी केला