नागपूर : विरोधी पक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खूप आदराने बघितले जात होते, मात्र त्यांनी जेव्हा मी दोन पक्ष फोडून आलो, असे वक्तव्य केले ते आम्हाला अपेक्षित नव्हते. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर त्यांच्याविषयी विश्वसनीयता कमी झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार)नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंगणा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्या प्रचारासाठी त्या नागपुरात आल्या असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मला खरेतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होती.  आघाडी सरकार असताना विरोधी पक्ष नेते म्हणून काम करीत होते,  त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, युवा कर्तुत्ववान नेता पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले होते, अशा युवा नेत्याकडून विरोधात असले तरी अपेक्षा होत्या. विरोधक दिलदार असावा तेव्हा राजकारण करताना मजा येते होती, मात्र त्यांनी फक्ष फोडाफोडीचे राजकारण केले हे राज्यातील जनतेला पटणारे नाही आणि त्यामुळे त्यांची विश्वसनीयता कमी झाली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >>>“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

सिंचना संदर्भात ७० हजार कोटीचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर केले होते. त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जे आरोप झाले होते त्याबाबतीत पुढाकार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. खरे तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी होणे अपेक्षित होते. फडणवीस यांनी गोपनीयतेची शपथ घेतली, ज्या व्यक्तीवर, पक्षावर आरोप केले,त्या व्यक्तीला  घरी बोलावून त्यांनी फाईल दाखवली, मुख्यमंत्र्याच्या घरात बसून अजित पवारांना ती फाईल दाखवली, हे मी म्हणत नाही तर अजित पवार स्वत: म्हणाले होते. आम्हाला भ्रष्टाचारी म्हणून म्हटले जात असेल तर आता भ्रष्टाचार मुक्त भारताचे काय झाले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>>रामटेकमध्ये काँग्रेसचा ‘मविआ’विरोधातच प्रचार? शिवसेनेचा आरोप

शरद पवारांविषयीचे वक्तव्य दुर्दैवी

शरद पवार यांची शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य सत्तापक्षाकडून केले जात असेल तर दुर्देव आहे. कुठलाच वैरी असे म्हणणार नाही. गेल्या सहा दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही मतदारांना भावनिक केले नाही, त्यांनी विकासावर मत मागितले. शरद पवाराना खूप मोठे आयुष्य आहे.असे त्या म्हणाल्या.नरेंद्र मोदी आमचे विरोधक असले तरी मला वाटतं की त्यांनी शंभर वर्ष जगावे असेही त्या म्हणाल्या.

अदानीसोबत बैठकीचा अजित पवार यांनी खुलासा करावा

अदानीसोबत बैठक झाली की नाही याबाबत माहिती अजित पवारांना विचारावी लागेल. मला त्याबाबत काही माहिती नाही. बॅग तपासणीवरुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे .त्यांनी आवाज उठवल्यावर आता सर्वाच्या बॅग तपासणी होत आहे आणि हेच आम्हाला अपेक्षित होते असेही त्या म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule raise question on devendra fadnavis credibility over divide politics vmb 67 amy