बुलढाणा : आपल्या बहुचर्चित धनगर जागर यात्रेदरम्यान खामगाव येथे पार पडलेल्या सभेत व माध्यमांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे ‘बारामती’ला लक्ष्य केले. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कोल्हटकर भवनात त्यांची सभा पार पडली. यादरम्यान त्यांनी निवडक माध्यमांशी संवाददेखील साधला. ज्याच्यावर ‘त्यांची’ सावली पडली, त्याची माती झाली, अशी जहरी टीका त्यांनी नामोल्लेख न करता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र त्यांचा इशारा कुणाकडे होता हे उपस्थित समाज बांधवांना स्पष्ट समजेल, अशीच त्यांची देहबोली होती. सुप्रिया सुळे यांनी काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत, राज्यात महाराष्ट्र विरोधी अदृश्य शक्ती कार्यरत असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना, सुप्रिया सुळे यांना जवळचा चष्मा लागला आहे. त्यामुळे ‘जवळचं ही’ दिसत नाही, असा उपरोधिक टोला पडळकर यांनी लगावला. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास सर्वात आधी बारामती मतदार संघ आरक्षित होऊ शकतो, असा भाकितवजा गौप्यस्फोट त्यांनी केला.

हेही वाचा >>> “सत्ताधारी पक्षाचा असलो तरी आमदार म्हणून…”, किशोर जोरगेवार यांची खंत

या आरक्षणाच्या अंमलबजावणीमध्ये वाटेल ते अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगे पाटील यांचे आंदोलन व आजची त्यांची जालन्यातील सभा यावरही त्यांनी मत व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी आमची भूमिका आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> खासदार नोकरी महोत्सवात २१९६ उमेदवारांना नियुक्ती पत्र

आदिवासी समाज आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा काडीमात्रही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजातील जे लोक बोलत आहेत त्यापैकी ९० टक्के आदिवासींना अजून जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. दोन दिवसात किती आदिवासींची जात पडताळणी केली याची यादी जाहीर केल्यास चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पडळकर यांनी दिली.