वर्धा : गांधी जयंतीनिमित्त वर्धा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवनार व सेवाग्राम आश्रमात भेट देत अभिवादन केले. त्यानंतर काही भेटी आटोपून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील. वर्षातून एकदा सेवाग्राम आश्रमाला भेट देत असते. त्यामुळे नवी ऊर्जा मिळते. पुढे त्या म्हणाल्या की राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास सोयाबिनला सात हजार तर बारा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देवू. या ट्रिपल इंजिन सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे. इतरांचे घर फोडण्याची यांची धडपड चालली आहे. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख, रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, सुधीर कोठारी, समीर देशमुख, अतुल वांदिले प्रामुख्याने उपस्थित होते.
पक्षाने संधी दिल्यास वर्ध्यातून लोकसभा लढणार-सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील. वर्षातून एकदा सेवाग्राम आश्रमाला भेट देत असते. त्यामुळे नवी ऊर्जा मिळते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-10-2023 at 09:30 IST
TOPICSराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसुप्रिया सुळेSupriya Sule
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule will contest lok sabha from wardha if given a chance by the party pmd 64 ysh