गोंदिया : सैन्यात सेवा बजावणारे तुमखेडा खुर्द, गोंदियाचे शूरवीर सैनिक सुरेश हुकलाल नागपुरे यांचे लेह, लडाख येथे शून्याखालील तापमानात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
हेही वाचा – नेत्याचा फोन अन् पोळ्याची सुटी पाड्व्याला, काय नेमके घडले?
जवान सुरेश नागपुरे यांचे पार्थिव आज शुक्रवारी रात्री त्यांच्या मूळ गावी तुमखेडा येथे नेण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी जवान नागपुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.