नागपूर : उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने डॉक्टरांनाही विळखा घातला आहे. मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयातील सुमारे १२५ डॉक्टरांना हा आजार झाला असून त्यापैकी सुमारे १० डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत.

नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माध्यभारतातील अत्यवस्थ रुग्ण उपचाराला येतात. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या येथील डॉक्टरांसह शहरातील खासगी रुग्णालयांतही डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही डेंग्यू,चिकनगुनिया आजारांनी त्रस्त केले आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यात मेडिकलच्या सुमारे ६५ निवासी डॉक्टरांमध्ये डेंग्यू तर सुमारे ४५ रुग्णांना चिकनगुनिया सदृश आजाराचे निदान झाले. मेयोतही सुमारे ८ रुग्ण या दोन्ही आजाराच्या लक्षणांनी ग्रस्त होते. जास्तच त्रास असलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मेडिकलच्या वार्डात एका निवासी डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये रुग्ण वाढल्याच्या वृत्ताला मार्डचे राज्य कोषाध्यक्ष डॉ. शुभम महल्ले यांनी दुजोरा दिला.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
unregistered doctors , Maharashtra Medical Council,
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा निर्णय
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र
WHO On HMPV Virus 
HMPV Virus : HMPV व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत WHO नं दिली मोठी अपडेट; जगभरातल्या नागरिकांना दिलासा!

हेही वाचा…करदात्यांचे पैसे मोफत का वाटत आहात? उच्च न्यायालयात याचिका….

झुडपांमुळे डास वाढले

मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे आहेत. यात पाणीही साचते. त्यामुळे येथे डासांची संख्या जास्त आहे. महापालिकेकडून अधून-मधून कीटकनाशक फवारणी होते. परंतु ती नियमित व्हावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर अत्याचार व हत्या प्रकरणानंतर डॉक्टरांच्या सुरक्षसह इतर मुद्यांवर संप केला होता. त्यामुळे ही मागणी कधी पूर्ण होणार, याकडे आता सर्व निवासी डॉक्टरांचे लक्ष लागले आहे.

“मेडिकलमध्ये सध्या डेंग्यूचे निदान झालेल्या एका निवासी डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. काही डॉक्टर डेंग्यू, चिकनगुनियातून बरे झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागासोबत मिळून कीटकनाशक फवारणी केली जात असून डास नियंत्रणात आहेत.” – डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

हेही वाचा…उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….

नागपुरातील डेंग्यू आणि चिकणगुणियाची स्थिती

नागपूरच्या शहरी भागात १ जानेवारी ते २७ ऑगस्ट २०२४ दरम्यानच्या काळात डेंग्यूचे १०४ तर चिकनगुनियाचे तब्बल ३८६ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी सर्वाधिक रुग्णांची नोंद ऑगस्ट महिन्याच्या २७ दिवसांमध्ये केली गेली. ऑगस्ट महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ५३ तर चिकनगुनियाचे २६८ रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान आजार नियंत्रणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात तापाच्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्याअंतर्गत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन पाणी साठवलेल्या जागांची पाहणी करत आहेत. त्यात हजारो घरांमध्ये डेंग्यूच्या डास अळ्या आढळत असून त्या नष्ट केल्या जात आहे.

हेही वाचा…लोकजागर: पूजा खेडकर ते शुभम गुप्ता!

२०२४ मधील स्थिती

महिना            डेंग्यू चिकनगुनिया

जानेवारी ००             ००

फेब्रुवारी ०६             ००

मार्च             ०२             ००

एप्रिल            ०१             ००

मे             ०४             ००

जून             ०८             ३०

जुलै             ३०             ८८

ऑगस्ट- २६ ५३             २६८

एकूण १०४             ३६८

Story img Loader