विदर्भात मेंदू, हृदय, मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नागपुरातील मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातच होते. परंतु, संपामुळे चार दिवसांपासून येथील सर्व शस्त्रक्रिया ठप्प आहेत. मेडिकल, मेयोसह इतरही शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे हाल होत आहेत. मेडिकल, मेयो, सुपर, राज्य कामगार रुग्णालय, डागा, शासकीय दंत महाविद्यालयासह इतरही शासकीय रुग्णालयात २४ तासांत तीनशे ते साडेतीनशे नियोजित शस्त्रक्रिया होतात. परंतु संपामुळे ही संख्या शंभरच्या खाली आली आहे.
हेही वाचा >>> लव्ह जिहाद’च्या आधारे मुस्लिमांचा लोकसंख्या वाढीचा प्रयत्न!
या रुग्णालयांत प्रशिक्षणार्थींच्या बळावर रुग्णसेवा सुरू आहे. प्रशिक्षणार्थींना अनुभव नसल्याने अतिदक्षता विभाग, आकस्मिक विभाग, ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांना प्रचंड मन:स्ताप होत आहे.
‘मेयो’तील दाखल रुग्णसंख्या घटली
मेयोतील रुग्णसंख्या शुक्रवारी ३६० रुग्णांवर आली. ही संख्या गुरुवारी ४१६ होती, हे विशेष. मेडिकललाही अशीच स्थिती आहे. परंतु कुणालाही बळजबरीने सुटी दिली जात नसून सर्वांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासन करीत आहे.