वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्थेच्या रूग्णालयात हत्तीरोगाने पीडित रुग्णाच्या पायावर पहिलीच लसिका ग्रंथी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

सावंगी मेघे येथील सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लिम्फॅटिक फिलेरियासिस आणि त्यावरील उपचार या विषयावर एक दिवसीय प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान फायलेरिअल एडिमा म्हणजेच हत्तीरोगाने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ वर्षीय रुग्णावर लसिका गाठी प्रत्यारोपणाद्वारे उपचार करण्यात आले.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
enior citizen declared brain dead and his liver donation saved persons life
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
Makar Sankranti motorcyclist died after nylon manja got stuck in his neck
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
Tokyo subsiding epidurals for pregnant women
वेदनारहित प्रसूतीसाठी ‘या’ देशात महिलांना पैसे का दिले जातायत? काय आहे एपिड्युरल?

हेही वाचा – रामटेक वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू; वीजप्रवाहाने शिकार केल्याची दाट शक्यता

हत्तीरोगामुळे सदर रुग्णाच्या पायावर मोठ्या प्रमाणात सूज आल्याने चालणे कठीण झाले होते. सुजेमुळे पायात चपला जोडे घालणे शक्य नसल्याने पायाला सतत इजा होऊन जखम भरण्यासही वेळ लागत असे. तसेच या वेदनादायी व्याधीमुळे दैनंदिन व्यवहारातही अडथळा निर्माण झाला होता. सदर रुग्णाच्या पायातील दूषित व निकामी लसिका ग्रंथी काढून त्याऐवजी मानेतील लसिका ग्रंथींचे प्रत्यारोपण करण्यात आले. कार्यशाळेला आलेले मार्गदर्शक मुंबई येथील नानावटी रुग्णालयातील निष्णात प्लास्टिक सर्जन डॉ. भरत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मायक्रो व्हॅसक्युलर लिम्फ नोड ट्रान्सफर शस्त्रक्रिया डॉ. फिरोज राजीव बोरले आणि डॉ. सिद्धार्थ मेंदीरत्ता या शल्यचिकित्सकांनी यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेली. या शस्त्रक्रियेमुळे आगामी काळात रुग्णाच्या पायावरील सूज यथावकाश कमी होत जाईल आणि त्याची कार्यक्षमता पूर्वीपेक्षा वृद्धिंगत होईल, असे डॉ. बोरले यांनी सांगितले.

हेही वाचा – रामटेक वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू; वीजप्रवाहाने शिकार केल्याची दाट शक्यता

मानेतील लसिका ग्रंथींचे पायात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया देशात फारच कमी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये होत असून या यादीत आता सावंगी मेघे रुग्णालयाचे नाव समाविष्ट झाले आहे. स्तनांच्या अथवा पायाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर हातापायावर येणाऱ्या सुजेवर उपचार करण्यासाठीही लिम्फ नोड ट्रान्सफर शस्त्रक्रिया उपयुक्त आहे, अशी माहिती कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन भोला यांनी दिली.

Story img Loader