लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: उपराजधानीत डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार रोखण्यासाठी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घरा- घरात ताप रुग्णांचे सर्वेक्षण होत आहे. त्यात हजारो कुलर, कुंड्यासह इतर साहित्यात डेंग्यूच्या अळ्या बघता हे डास उत्पत्ती केंद्र ठरत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी नोंदवत आहे. यातून डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे ताप रुग्ण सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत शहरात १ लाख ६२ हजार ८९५ घरांचे सर्वेक्षण झाले. त्यात घरातील ताप रुग्णांची माहिती घेण्याशिवाय घरातील कंटेनर सर्वेक्षण केले जात आहे. सर्व्हेक्षणात घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे.

आणखी वाचा-विमा रुग्णालयांचा डोलारा प्रभारींवर; राज्यभरातील कामगारांना…

नागपुरात ७ ऑगस्टपर्यंत दहाही झोनमध्ये सर्व्हेक्षण झालेल्या घरांमध्ये एकूण ४३६९ दूषित भांडी आढळून आली. यात ६ हजार २७८ कुलर, १ हजार ११२ टायर, ५ हजार २९० कुंड्या, २ हजार ८८९ ड्रम, १ हजार २४० मडके, ८९४ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि १ हजार ७४५ इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा म्हणजेच अळ्या आढळून आला. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकून तो नष्ट केला गेला.

नागपुरात डेंग्यूच्या ६३ तर चिकनगुनियाच्या १५२ रुग्णांची नोंद

नागपुरात १ जानेवारी २०२४ ते ६ ऑगस्ट २०२४ दरम्यानच्या कालावधीत चिकनगुनियाचे एकूण १५२ रुग्ण तर डेंग्यूच्या ६३ रुग्णांची नोंद झाली. चिकनगुनियाचे सर्वाधिक ७९ रुग्ण मंगळवारी झोनमध्ये तर ६२ रुग्ण धरमपेठ झोनमध्ये नोंदवले गेले. लक्ष्मीनगर झोनमध्ये २, हनुमाननगर झोन २, धंतोली झोन १, नेहरूनगर झोन २, सतरंजीपुरा झोन १, आशीनगर झोनला १ रुग्णाची नोंद झाली. तर डेंग्यूचे लक्ष्मीनगर झोनमध्ये ११ रुग्ण, आशीनगर झोन १०, लकडगंज झोन ८, धरमपेठ झोन ७, हनुमाननगर झोन ६, धंतोली झोन ६, नेहरूनगर झोन ४, गांधीबाग झोन २, सतरंजीपुरा झोन ३, मंगळवारी झोनमध्ये ६ रुग्ण नोंदवले गेले.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम रोखले; स्वपक्षीय संघटनेचा…

महापालिका आयुक्तांचे म्हणणे काय?

“पावसाळ्यात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया सारखे आजार डोके वर काढतात. या आजारावर नियंत्रणासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा. त्यानुसार घरातील सर्व भांडे कोरडे ठेवावे. परिसरात स्वच्छता ठेवून पाणी जमा होणार नाही म्हणून काळजी घ्यावी. एकही लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या महापालिकेची रुग्णालये वा शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावा,” असे आवाहन नागपूर महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.