नागपूर: वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढल्याने कुणी आजारी पडल्यास कुटुंब आर्थिक कोंडीत सापडते. काही रुग्णांना घरात उपचाराचीही गरज भासते. या रुग्णांसाठी रुग्णशय्या (बेड), प्राणवायू सिलेंडर वा इतरही साहित्याची गरज भासते. हे साहित्य खूप महाग असल्याने सर्वांनाच खरेदी करता येत नाही. या रुग्णांसाठी नागपुरात सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य प्रकल्पाद्वारे मदतीचा हात दिला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपुरातील प्लाॅट क्र. २९२, नवीन सुभेदार ले- आऊट येथे हा प्रकल्प आहे. आजार, अपघात, किंवा वार्धक्यामुळे बऱ्याचदा बाह्य ऊपकरण लागतात. हे उपकरण खर्चिक असून त्याचे काम झाल्यावर पुढे या उपकरणांचे काय? हा देखील एक प्रश्नच आहे. तेव्हा या सर्व बाबींचा विचार करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अयोध्या भागाने सप्टेंबर २०१७ ला सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य सेवा प्रकल्पाची सुरुवात केली. रा. स्व. संघाचे पहिले सेवा प्रमुख म्हणून सूर्यनारायणरावजींकडे दायित्व असल्याने त्यांचे नाव प्रकल्पाला दिले गेले.
हेही वाचा >>>दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी का होते आहे? नेमके कारण…
प्रकल्पासाठी एका स्वयंसेवकाने दोन वर्षांसाठी स्वत:चे दुकान दिले. दुसऱ्याने ५ हजार रुपयांची देणगी दिल्यावर वाॅकरसह इतर साहित्य घेतले गेले. या साहित्याचे वितरण गरजूंना करणे सुरू झाले. प्रकल्पासाठी कालांतराने दान येत गेले साहित्य वाढत जाऊन मदतही वाढत गेली. प्रकल्प दुसऱ्या वास्तूमधे स्थानांतरित झाले. आता प्रकल्पाकडे ३८ रुग्णशय्या, २० व्हीलचेअर, ७० वाॅकर, ४० कमोड चेअर, १०० ज्येष्ठ नागरिकांच्या काठी, सक्शन मशीन, ५ प्राणवायू काॅनसनट्रेटर, प्राणवायू सिलेंडर, शितपेटीसह इतरही बरेच साहित्य आहेत. हे साहित्य नाममात्र दरावर घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपलब्ध केले जाते. आतापर्यंत नागपुरातील विविध भागासह वडधामना, बुटीबोरी, कामठी, हिंगणा तालुका, इतरही काही जिल्ह्यातील सुमारे ३ हजारांवर रुग्णांना साहित्याचा लाभ दिला गेला आहे.
दोन ई-रिक्षाचालकही प्रकल्पाशी जुळले
दोन ई-रिक्शाचालकही प्रकल्पाशी जुळले आहे. ते रुग्णशय्येसह इतरही अवजड साहित्य रिक्शात टाकून त्यांच्या घरी सोडून देतात. हे साहित्य तेथे असेंबलही केले जाते. त्यातून त्यांना थोडा राजगारही मिळाल्याची माहिती जयंत जोशी यांनी दिली. प्रकल्पाशी पैरामेडिकल स्टाफ, तसेच ई-रिक्शाचालक जुळले आहेत. हे सर्व जण गरजे प्रमाणे रुग्णांची मदत करतात. प्रकल्प अत्यल्प दरात सेवा शुल्क आकारतो. हा पैसा जागेचे भाड़े, वीज आणि पाणी बील तसेच साहित्याच्या देखभाल- दुरूस्तीसाठी वापरला जातो.
हे साहित्य उपलब्ध
सध्या व्हीलचेअर, व्हील कम कमोड चेअर, रुग्णशय्या (बेड), कमोड राईजर, वॉकर, कमोड चेअर, सक्शन मशीन ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्संट्रोटर, स्टिक, शीतपेटी, सी पेप मशीन, कुबड्या हे साहित्य उपलब्ध आहे. गरजू रुग्णांनी कार्यालयाच्या पत्यावर अथवा ९४२३६८०२८२, ९७३०४४३६८७ ९८२२७०२०९३ या क्रमांकावर संपर्क केल्यास ही मदत मिळणे शक्य आहे. यासाठी दाणदात्यांनी मदत केल्यास सेवा प्रकल्प वाढण्यास मदत होईल, असे आवाहन प्रकल्प प्रमुख जयंत जोशी यांनी केले.