अकोला : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेसाेबत बेईमानी केल्यानेच भाशिवसेनेबरोबरजपाला कसब्यात २८ वर्षांनंतर पराभवाचा सामना करावा लागला, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
शिवगर्जना अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय म्हणजे एका अर्थाने धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात आहे.
हेही वाचा >>> कसब्यातील पराभवावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल वाढत चालला. हे पाच विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कसबा पोटनिवडणुकीत सिद्ध झाले. या निवडणुकीतील निकालामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले. भाजपासोबत जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना होती, तोपर्यंत त्यांना विजयाची खात्री होती. ज्या क्षणी शिवसेनेसोबत बेईमानी केली, त्या क्षणी खऱ्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली. त्याचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झाला.’’
खऱ्या शिवसेनेशी फारकत घेतल्यामुळेच भाजपाने २८ वर्ष जिंकलेली कसब्याची जागा आता गमावली लागली आहे, असा दावा अंधारे यांनी केला.