Sushma Andhare Facebook Post On Death Threat : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक दावे करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यात दहशत आणि दबाबतंत्राचे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा परिस्थितीत ही घटना घडल्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट

ही संपूर्ण घटना सांगताना शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर संघर्ष सुरू आहे. अशातच आत्ता ३ वाजून ३६ मिनिटांनी (पहाटे) नागपूर विमानतळावर बाहेर पडण्यासाठी असलेल्या फाटकाजवळ विचित्र घटना घडली. मी आणि माझी ७ वर्षांची लेक समता सैनिक दलाच्या स्मिता कांबळे यांच्याबरोबर होते. साधारण ६ फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले, तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.”

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
raveena tandon on saif ali khan attacked
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”

हे ही वाचा : मोदी सरकारची परीक्षा! लोकसभेत सादर होणार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक; सर्व पक्षांकडून खासदारांना व्हीप

मुख्यमंत्र्यांना आवाहन

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन करत या प्रकरणाचा तपास करावे असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्रजी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूप वेळा वाटले. मात्र, दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले.”

…त्यावर माझा फारसा विश्वास नाही

यावेळी अंधारे यांनी #टीप असे लिहित म्हटले की, “शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.”

Story img Loader