नागपूर : नागपूर काही फडणवीस किंवा भाजपाचा बालेकिल्ला नाही. नागपूरला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही बालेकिल्ला मानत नाही. नागपूर हे दीक्षाभूमीचे केंद्र आहे, ऊर्जाभूमीचे केंद्र आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली, असे स्पष्ट उत्तर सुषमा अंधारे यांनी दिले.
हेही वाचा – नागपूर : लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन अधीक्षकाला अटक
महाप्रबोधन यात्रा काढण्यापूर्वी अंधारे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. नागपूर ही परिवर्तनाची भूमी आहे. राज्यात जर परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी दीक्षाभूमीपेक्षा जास्त उपयुक्त ठिकाण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीतून परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही महाप्रबोधन यात्रा नागपूरमधून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. नागपूरला फडणवीसांचा किंवा भाजपाचा बालेकिल्ला संबोधित करणे योग्य नाही. कुणीही असा गैरप्रचार करू नये, असेही त्या म्हणाल्या.