नागपूर: पत्नीचे कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी बाबुलखेड्यात घडली. स्नेहा मनिष मेश्राम (३५, वसंतनगर, बाबुलखेडा) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. तर मनिष ज्ञानेश्वर मेश्राम (४७) असे आरोपी पतीचे नाव आहे.
मनिष आणि स्नेहा यांचे २०११ मध्ये लग्न झाले. स्नेहा एका पॅथॉलॉजीमध्ये नोकरी करते. तर मनिष हा बेरोजगार असून दारुड्या आहे. पत्नी नोकरीवर जाताना तो तिचा पाठलाग करून तिच्यावर पाळत ठेवत होता. कुण्यातरी युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. चारित्र्यावर संशय घेऊन तो पत्नीशी नेहमी वाद घालत होता. रविवारी स्नेहा ही बहिणीकडे जात असताना मनिषने तिच्याशी वाद घातला. त्यानंतर खिशातून चाकू काढून स्नेहावर हल्ला केला. तिने आरडाओरड केली असता मनिषने तिच्या पोटात चाकू भोसकून पळ काढला.
हेही वाचा… नागपूर: कारमध्ये पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
शेजाऱ्यांनी लगेच स्नेहा हिला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी स्नेहाची बहिण पायल उके यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी मनिष मेश्राम याला अटक केली.