जिल्हा परिषद सदस्य सुरेश मापारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. पदाचा दुरूपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मापारी यांना जि.प. सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश १९ ऑक्टोबर रोजी दिला होता. मापारी यांनी या आदेशाला नागपूर खंडपीठात आव्हान दिले. खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्णयामुळे मापारी यांना आज होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विषय सभापतीपदासाठीच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले असते. मात्र, नागपूर खंडपीठाने या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे मापारी यांना सभापती पदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in