चंद्रपूर : ओबीसी एस.सी, एस.टी. व एन.टी. उमेदवारांना आरक्षण लागू असताना त्यांचे आरक्षण रद्द करून ३६० पदांसाठी राबवण्यात येणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती प्रक्रिया विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बँकेतील संचालक मंडळाला जबर धक्का बसला. आता ही भरतीप्रक्रिया आचार संहितेनंतरच राबविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात संचालक मंडळाकडून नोकरभरती मुद्याचा वापर केला जात होता, अशाही तक्रारी झाल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येत्या १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत ३६० पदाकरिता नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती. या भरती प्रक्रियेसाठी तीन दिवसांत परीक्षा नियोजित होती. अगदी सुरुवातीला उच्च न्यायालयात बँकेने दिलेल्या शपथपत्रात भरती प्रक्रिया टी.सी.एस. कंपनीमार्फत पारदर्शकपणे राबवली जाईल, असे नमूद होते. मात्र, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने ठराव घेऊन अन्य आयटी कंपनीला नोकर भरतीच्या परीक्षेचे काम दिले. तसेच ३६० पदांच्या भरतीत ओबीसी, एससी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारण्यात आले. त्यामुळे बेरोजगारांमध्ये तीव्र रोष होता. याप्रकरणी अनेकांनी सहकार आयुक्त, पुणे कार्यालयाकडे असंख्य तक्रारी केल्या. तसेच विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात बँकेची नोकर भरती प्रक्रिया राबवणे गैर आहे, याला स्थगिती द्यावी, अशीही मागणी सहकार आयुक्तांकडे करण्यात आली.

Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

आणखी वाचा-फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

काँग्रेसचे संचालक मंडळ विधानसभा निवडणुकीत या नोकर भरतीचा प्रचार करीत होते. याप्रकरणी असंख्य तक्रारी सहकार आयुक्त, पुणे कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. आदर्श आचारसंहिता कालावधीत नोकरभरती पक्रिया राबवू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांना दिले आहे.

नोकरभरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच नोकरभरती प्रक्रिया पूर्ववत राबविण्यात येणार आहे, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले.

Story img Loader