वर्धा : प्रजासत्ताक दिनी अशांतता निर्माण केल्याचा ठपका ठेवून येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले असून काहींना वसतिगृह सोडण्याचे निर्देश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला हिंदी विद्यापीठात प्रशासनाने ध्वजारोहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यासपीठावर मान्यवर मंडळी तसेच सर्व श्रोत्यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात अडथळा निर्माण केला. काळे झेंडे फडकवून नारेबाजी केली. विद्यापीठाच्या कुलगुरूंचा अपमान होईल असे वर्तन केले. यामुळे विद्यार्थ्यांविषयी रोष निर्माण झाला. ध्वजारोहन कार्यक्रमाला यामुळे गालबोट लागले. असा ठपका स्त्री अध्ययन विभागातील राजेशकुमार यादव, मानव विज्ञान विभागातील रजनीशकुमार अंबेडकर यांच्यावर ठेवण्यात आला. विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीने याची चौकशी केली. त्यात दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली.

हेही वाचा – आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार

विद्यापिठाचे शैक्षणिक वातावरण यापूर्वीदेखील खराब करण्याचा प्रयत्न याच विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे त्यांचे पूर्वीदेखील निलंबन करण्यात आले, असे चौकशी समितीने नमूद केले. आंतरराष्ट्रीय संस्था असणाऱ्या विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण भयमुक्त राहणे आवश्यक आहे. म्हणून राजेशकुमार व निरंजनकुमार या दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानी जाहीर केला. तसेच रजनीशकुमार अंबेडकर या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात आला. दोषी विद्यार्थ्यांची वसतिगृह नोंदणी रद्द करण्यात आली असून त्यांना त्वरीत खोली रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले.

हेही वाचा – “जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार,” नितीन गडकरी यांचे टीकास्त्र; म्हणाले…

विद्यापीठाच्या विरोधात अभद्र, अवमानकारक टिप्पणी, अफवा पसरविणे, शिक्षकांना शिवीगाळ असे प्रकार काही विद्यार्थ्यांनी केले. त्यात दोषी दिसून आलेल्या नाट्यकलेचा विद्यार्थी विवेक मिश्र तसेच स्त्री अध्ययन विभागाचा रामचंद्र यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे ही माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिरगे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspension of students of hindi university instructions for leaving the hostel pmd 64 ssb
Show comments