घरासमोर खेळत असलेली पाच वर्षीय चिमुकली अचानक बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाक्यात तरंगताना आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. मात्र, ती चिमुकली खेळताना पाण्याच्या टाक्यात पडली कि तिचा खून करून पाण्यात फेकण्यात आले, याबाबत पोलिसांनी संशय व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. ज्योती राजू शाहू (रा. बेसा) असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा >>>नागपूर: भारत वि.ऑस्ट्रेलिया सामना, नागपूरमध्ये थेट मैदानातूनच सट्टा खेळणाऱ्या चौघांना अटक

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अंजोरी शाहू (३८) हे मूळचे छत्तीसगढमधील रहिवाशी असून कामाच्या शोधात नागपुरात आले होते. ते पत्नी व चार मुलींसह बेसामध्ये भाड्याने राहत होते. त्यांची सर्वात लहान मुलगी ज्योती ही मूकबधीर होती. ती गुरुवारी दुपारी तीन वाजता घरासमोर खेळत होती. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. सायंकाळी होऊनही मुलगी घरी परतली नसल्याने तिचा पालकांनी शोध सुरू केला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनीही रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली. मात्र, मुलगी मिळून आली नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ज्योतीचा घराजवळील पाण्याच्या टाक्यात मृतदेह तरंगताना आढळला. तुर्तास बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हेही वाचा >>>चंद्रपूर: हंसराज अहीर यांच्या आरोपाने खळबळ; भावाच्या मृत्यूला डॉक्टर विश्वास झाडे जबाबदार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुलीच्या घातपाताची शक्यता
नातेवाईक आणि पोलिसांना एका टाक्यातील पाण्यात ज्योती पडल्याचा संशय आला. त्यामुळे ते टाके पोलिसांनी संपूर्ण पिंजून काढले. मात्र, त्यात ज्योतीचा मृतदेह आढळला नाही. परंतु, दुसऱ्या दिवशी त्याच टाक्यातील पाण्यात मृतदेह मिळून आला. त्यामुळे ज्योतीचा कुणीतरी खून करून मृतदेह पाण्यात टाकल्याचा संशय आहे. मुलीसोबत काही अनुचित प्रकार घडल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.