जलसमाधी आंदोलनामुळे पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम तुटपुंजी असल्याने स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर चांगलेच संतापले. त्यांनी कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह थेट बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या दिला. यावेळी त्यांनी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. यामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते.

हेही वाचा- “अजित पवारांनी उंचीचा विचार करून बोलावं”; राज्यपालांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

तुपकर यांच्या अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनामुळे पीक विम्यापोटी जिल्ह्यासाठी १०३ कोटी रुपये मंजूर झाले. तुपकर यांच्यासमवेतचा कार्यकर्त्यांच्या ताफा मुंबईहून बुलढाणाकडे रवाना झाला असताना विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे सुरू झाले. मात्र, ही रक्कम तुटपुंजी व शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करणारी असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी ही बाब सोमवारी तुपकरांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे संतप्त तुपकरांनी दुपारी १ वाजता शेतकरी व कार्यकर्त्यांसह अजिंठा मार्गावरील कृषी कार्यालय गाठले. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कक्षातच ठिय्या मांडून जाब विचारला. ‘एआयसी कंपनी’चे जिल्हा समन्वयक दिलीप लहाने याना धारेवर धरले. तेथूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली. दुपारी ४ वाजेपर्यंत हा ठिय्या कायम होता. यामुळे कृषी कार्यालय परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

Story img Loader