बुलढाणा : स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बुथ पाहणीसाठी शेगावकडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून घटनेने जळगाव मतदारसंघ, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व चालक गंभीर जखमी झाले. याचवेळी प्रशांत डिक्कर यांना छातीत असह्य वेदना झाल्याने ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डिक्कर समर्थकांकडून , हा हल्ला विरोधक गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी ३ सभा १ रॅली केली होती. त्यावेळी उमेदवारासह संभाजीराजेंनी देखील याभागातील दहशती विषयी चिंता व्यक्त केली होती. एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा, शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रथापितांसमोर मोठे आव्हान उभे करतो, हे प्रस्थापित नेत्याला पाहवले नाही. लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक मोठ्या नेत्याने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे. हा माज आम्ही उतरवू, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
BJP wins in Maharashtra Haryana due to Narendra Modi influence
मोदींच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, हरियाणात भाजपचा विजय; ‘दी मॅट्रीझ’ संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
आम आदमी पक्षाने 'त्या' १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पार्टीने ‘त्या’ १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं?
NCP leader Sunil Kolhe, Sunil Kolhe attack case,
बुलढाणा : राष्ट्रवादीचे नेते सुनील कोल्हे हल्ला प्रकरण; विक्की आव्हाडसह चौघे जेरबंद

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :नागपुरातील नाईक तलाव जवळ ईव्हीएम बंद, मतदारांची दमछाक

शेगाव कालखेड गावाजवळ हल्ल्यानंतर प्रशांत डिक्कर यांना शेगावमधील हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने डिक्कर यांना अकोला येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांना अटॅक आल्याची शक्यता आहे.

हेही वाचा…आदर्श मतदान केंद्रांचा लूक लक्षवेधी, नागपूरमध्ये ५० विशेष मतदान केंद्र

दरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे अकोल्यातील ओझोन रुग्णालयाला भेट देणार असून, प्रशांतच्या मागे ठामपणे उभे आहे, असे सांगण्यात आले आहे. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर शेतकऱ्यांचा आवाज असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे पक्षातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. जळगाव जामोद मध्ये गुंडांकडून स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला झाला असून त्यांच्यावर उपचार चालू आहे. प्रशांत चळवळीतील लढवय्या कार्यकर्ता असून निवडणुकातील पराभव समोर दिसत असल्याने काही प्रस्थापित नेत्यानी हा हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Story img Loader