नागपूर : एक्वा स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू अंजली गजभिये व नीलिमा धारकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रौढांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत नागपूरकरांची मान उंचावली. अंजली यांनी ३५ ते ४० वर्षे वयोगटातील २०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदके जिंकली. तसेच १०० फ्रीस्टाईल व ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदकही त्यांनी प्राप्त केले.५१ ते ५५ वयोगटात सहभागी नीलिमा यांनी २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक आणि ५० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये कांस्यपदक मिळविले. वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखाडे व विशाल चांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही खेळाडू सराव करतात. क्लबचे अध्यक्ष मोहन नाहातकर, सचिव मंगेश गद्रे, मिडलँड स्पोर्ट्सचे संचालक प्रशांत उगेमुगे, प्रीती लांजेवार, अश्विन जनबंधू व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभाकर साठे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
नागपूरच्या अंजली,नीलिमाची दुबईत चमकदार कामगिरी, प्रौढांच्या जलतरण स्पर्धेत जिंकले…
अंजली यांनी ३५ ते ४० वर्षे वयोगटातील २०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदके जिंकली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-11-2023 at 21:31 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swimmers anjali gajbhiye and nilima dharkar won dubai competition tpd 96 zws