नागपूर: जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवण्यात आले. नवीन आढळलेले दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३३२, ग्रामीण १०९, जिल्ह्याबाहेरील १८० अशी एकूण ६२१ रुग्णांवर पोहचली आहे. त्यापैकी आजपर्यंत शहरात २९७, ग्रामीण ८९, जिल्ह्याबाहेरील १४० असे एकूण ५२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर उपचारादरम्यान शहरात १९, ग्रामीणला १२, जिल्ह्याबाहेरील २९ असे एकूण ६० रुग्ण दगावले. त्यामुळे शहरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ५.७२ टक्के, ग्रामीण ११ टक्के, जिल्ह्याबाहेरील १६.२२ टक्के असे एकूण जिल्ह्यात ९.६६ टक्के नोंगवले गेले. तर तुर्तास शहरातील विविध रुग्णालयांत महापालिका हद्दीतील १६, ग्रामीण ९, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ३६ रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहे. त्यापैकी अत्यवस्थ संवर्गातील शहरात १, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ५ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; काँग्रेस नेते शशी थरूर यांची अपेक्षा

हेही वाचा >>> नागपूर : अधिसंख्य कर्मचाऱ्यांची बाईक मिरवणूक गडकरींच्या निवासस्थानी; उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार असल्याचे गडकरींचे आश्वासन

करोनाचे केवळ ५ रुग्ण रुग्णालयांत

शहरात २४ तासांत ९, ग्रामीणला ४ असे एकूण १३ नवीन करोनाग्रस्त आढळले. तर दिवसभरात शहरात १४, ग्रामीणला ९ असे एकूण २३ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे शनिवारी शहरात ८२, ग्रामीणला ३४ असे एकूण ११६ सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी केवळ ५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत तर १११ रुग्णांवर गृह विलगिकरणात उपचार सुरू आहेत.