नागपूर: जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवण्यात आले. नवीन आढळलेले दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३३२, ग्रामीण १०९, जिल्ह्याबाहेरील १८० अशी एकूण ६२१ रुग्णांवर पोहचली आहे. त्यापैकी आजपर्यंत शहरात २९७, ग्रामीण ८९, जिल्ह्याबाहेरील १४० असे एकूण ५२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर उपचारादरम्यान शहरात १९, ग्रामीणला १२, जिल्ह्याबाहेरील २९ असे एकूण ६० रुग्ण दगावले. त्यामुळे शहरात रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ५.७२ टक्के, ग्रामीण ११ टक्के, जिल्ह्याबाहेरील १६.२२ टक्के असे एकूण जिल्ह्यात ९.६६ टक्के नोंगवले गेले. तर तुर्तास शहरातील विविध रुग्णालयांत महापालिका हद्दीतील १६, ग्रामीण ९, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ३६ रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहे. त्यापैकी अत्यवस्थ संवर्गातील शहरात १, ग्रामीणला २, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ५ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत.
‘स्वाईन फ्लू’ मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्क्यांवर; २४ तासात २ रुग्णांची भर
जिल्ह्यात २४ तासांत २ नवीन ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त आढळले. तर शुक्रवारी या आजाराच्या ८ नवीन मृत्यूंवर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण ९.६६ टक्के नोंदवण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2022 at 12:27 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu death rate 2 patients added in 24 hours ysh