जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप कमी झाला आहे. परंतु, शुक्रवारी नागपूर महापालिकेत मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत आणखी चार मृत्यू ‘स्वाईन फ्लू’नेच झाल्यावर शिक्कामोर्तब केले गेले.महापालिकेतील आरोग्य कक्षात झालेल्या बैठकीला महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मेयो रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला राऊत, डॉ. मिलिंद सूर्यवंशी, प्रा. डॉ. भाग्यश्री वानखेडे, नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे उपस्थित होते. यावेळी विविध रुग्णालयात दगावलेल्या चार रुग्णांची प्रकरणे ठेवली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे शक्तीप्रदर्शन; विविध प्राधिकरणांच्या लवकरच निवडणुका

सगळ्यांच्या मृत्यूला स्वाईन फ्लूच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यात नागपूर ग्रामीणचा १, चंद्रपूर जिल्ह्यातील १, मध्य प्रदेशातील २ रुग्णांचा समावेश होता.या बैठकीत शहरात आजपर्यंत आढळलेल्या ६४७ रुग्णांपैकी ५६६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे पुढे आले. आजपर्यंत महापालिका हद्दीतील १९, नागपूर ग्रामीणचे ९, जिल्ह्याबाहेरील १८, इतर राज्यातील १४ असे एकूण ६० रुग्ण दगावल्याचे स्पष्ट केले गेले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu patient death meeting of medical department carporation of nagpur tmb 01
Show comments