नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गाभा क्षेत्र आता कुठे पर्यटकांसाठी खुले झाले आहे, पण या व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वाघांनी त्यांचा करिश्मा अजूनही कायम ठेवला आहे. म्हणूनच गाभा क्षेत्र सुरू होवूनही पर्यटकांची पावले मात्र बफर क्षेत्राकडे वळत आहे. निमढेला बफर क्षेत्रातील वाघाने मंगळवारी पर्यटकांनी असाच करिष्मा दाखवत पर्यटकांचा श्वास रोखून ठेवला. वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी ही घटना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीमढेला बफर क्षेत्रात सध्या “भानुसखिंडी” आणि तिच्या बछड्यानी पर्यटकांना वेड लावले आहे. १४ ते १५ महिन्याचे ‘भानुसखिंडी” आणि “छोटा मटका” यांचे बछडे नीमढेला बफर क्षेत्रात धुमाकूळ घालत आहेत.  या परिसरात रामदेगी मंदिर आहे आणि या मंदिर परिसरात या बछड्याचा बाप म्हणजेच “छोटा मटका” यांचे कायम वास्तव्य असते. याच परिसरात विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून झलाबाई नावाची एक महिला लहानपणापासून याच ठिकाणी वास्तव्यास आहे. मंदिरात दर्शनाला येणारे लोक तिच्याही दर्शनाला येतात आणि येथे असणाऱ्या टीनेच्या छताखाली स्वयंपाक करतात.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Video-2023-10-04-at-1.27.42-PM.mp4

हेही वाचा >>> हृदयविकाराच्या धक्क्याने जवानाचा मृत्यू

मंगळवारी काही भाविक टीनेच्या स्वयंपाक करत होते आणि त्याच टीनेच्या छतावर भानुसखिंडी वाघिणीचा बछडा त्याच्या करामती करत होता. त्याची भनकही भाविकाना नव्हती. तो जेव्हा छतावरून खाली आला तेव्हा भाविक जागीच स्तब्ध झाले. त्यांना काही कळायच्या आत मात्र तो बछडा निघून गेला होता. या परिसरात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होते, पन परिसरातील मंदिरात येणाऱ्या भाविकांचाही वाघांशी नेहमीच सामना होतो. मात्र आजतागायत वाघाने कधी भविकांवर हल्ला केलेला नाही. वाघ आपल्या वाटेने आणि भाविक आपल्या वाटेने.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba andhari tiger project open for tourists tigers rgc 76 ysh