नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी नोंदणीसाठी देण्यात आलेले कंत्राट, त्यासंबंधीचा झालेला करार आणि तो कार्यान्वित करण्याचे कार्य एका क्षेत्र संचालकांच्या कार्यकाळात तर तिकीट नोंदणीची सुरुवात मात्र दुसऱ्या क्षेत्र संचालकांच्या कार्यकाळात सुरू झाली. याचाच फायदा घेत सफारी नोंदणीचे काम सांभाळणाऱ्या ठाकूर भांडवांनी आर्थिक गैरव्यवहार केला. त्यामुळे या भावंडांना आशीर्वाद नेमका कुणाचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ९० कोटींची फसवणूक, एक रुपयाचाही परतावा नाही!

या व्याघ्रप्रकल्पातील १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांच्या ऑनलाईन तिकीट घोटाळ्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेने सुरू केल्यानंतर या प्रकरणात अनेकांची नावे समोर येत आहेत. यात ताडोबातील ‘रिसॉर्ट लॉबी’ देखील सहभागी होती. त्यामुळे त्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. ताडोबाचे तत्कालीन क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांच्या कार्यकाळात अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर संचालक असणाऱ्या ‘वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन’ या एजन्सीसोबत व्याघ्रप्रकल्पातील सफारीसाठी करार झाला होता. डॉ. जितेंद्र रामगावकर हे ताडोबाचे क्षेत्रसंचालक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सफारी नोंदणीला सुरुवात झाली. मात्र, ठाकूर भावंडांचा दबदबा आधीपासूनच ताडोबात असल्याने या प्रकरणात ठाकूर भावंडांना आशीर्वाद नेमका कुणाचा, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba andhari tiger project ticket scam by thakur brother zws
Show comments