ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक पातळीवर वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकल्पात वाघांच्या संख्येपेक्षा चपळ बिबट्याची संख्या अधिक आहे. ताडोबात ८७ वाघ तर १२८ इतक्या मोठ्या संख्येने बिबटे आहेत. विशेष म्हणजे काळ्या बिबट्याची नोंद देखील या प्रकल्पात झाली आहे.

हेही वाचा >>>Video : ताडोबातील ‘राका’ च्या अंगावर शावकांची मस्ती कॅमेऱ्यात कैद

भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा दरवर्षी होणाऱ्या वार्षिक अभ्यासानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ८७ असली तरी बिबटे मोठ्या संख्येने आहे. या प्रकल्पात येणाऱ्या बहुसंख्य पर्यटकांना वाघ दिसतो. बिबटे तुलनेत कमी दिसतात. त्याला प्रमुख कारण बिबटे अतिशय चपळ असतात. त्यामुळे पर्यटकांच्या दृष्टीला ते पडत नाही. वाघाची शारीरिक हालचाल अतिशय संथ असते. त्यामुळे वाघ जंगलात हमखास दिसतो. त्यामुळे पर्यटकांना वाघांची संख्या अधिक आहे असे वाटते. प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती नाही. या प्रकल्पात बिबट्यांची संख्या वाढली आहे. प्रकल्पात आजघडीला १२८ बिबट्यांचे अस्तित्व आहे.

हेही वाचा >>>वर्धा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेस बाशिंग बांधून काढली वरात; स्वत:ला फटके मारून वेधले भ्रष्टाचाराकडे लक्ष

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सह गावांचे मागील काही वर्षांत स्थलांतरण करण्यात आले. स्थलांतरणामुळे ताडोबातील वन्यजीव मोठ्या संख्येत वाढल्याचे समोर आले आहे. स्थलांतरित गावांच्या मोकळ्या जमिनीवर गवताळ प्रदेश तयार झाला. त्यामुळे देखील वाघ व बिबट्यांच्या तसेच इतर वन्य प्राण्यांची संख्या वाढली असल्याची माहिती या भागाचा सातत्याने अभ्यास करणारे व नुकतीच ताडोबा प्रकल्पाला भेट दिलेले प्रा.योगेश दूधपचारे यांनी सांगितले. वाघांसोबत बिबट्यांची संख्या वाढणे ही मोठी उपलब्धी आहे मानली गेली. २०१२ पासून वाघ व बिबट्यांची संख्या सातत्याने वाढत.आहे.