रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माया व तिच्या तीन बछड्यांचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मुक्तसंचार पर्यटकांना भूरळ घालणारा ठरतो आहे. पाण्यात पडलेल्या बछड्याला अलगद आपल्या जबड्यात उचलून सुरक्षित स्थली हलविणा-या मायाची ममता वन्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी प्रसिध्द आहे. ८६ वाघ व ५० पेक्षा अधिक वाघांचे बछडे या प्रकल्पात आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रकल्पात पर्यटकांची गर्दी आहे. १ ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला झाला. आतापर्यत २० हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली.

हेही वाचा >>>वर्धा : पाळीव श्वानाच्या मुत्राशयातून काढले तब्बल १०८ खडे; पशुवैद्यक डॉ. संदीप जोगेंसह सहकाऱ्यांना यश

ताडोबात सध्या माया वाघिण व तिच्या तीन बछड्यांचे पर्यटकांना मनसोक्त दर्शन होत आहे. नवेगाव रोड, कुंभी पाट भागात माया वाघिण कुटुंबकबिल्यासह मुक्तसंचार करीत असताना पर्यटकांना दिसते आहे. अशातच, माया आपल्या बछड्यांसोबत खेळत असताना तिचा एक बछडा पाण्यात पडला. हे पाहून मायाने लगेच त्याला आपल्या जबड्यात अलगद धरून सुरक्षित स्थळी हलविले. या सुखद प्रसंगाची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाली आहे.राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माया व तिच्या बछड्यांचे छायाचित्र समाजमाध्यमावर सार्वजनिक करीत पर्यटकांना ताडोबा प्रकल्पात येण्याचे आवाहन केले आहे.