चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प १ऑक्टोंबर पासून पर्यटनासाठी खुले झाले आहे. मात्र ताडोबा क्विन “माया” पर्यटक तथा ताडोबा व्यवस्थापनाला दिसली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान ताडोबा क्विन “माया” चे अखेरचे दर्शन २३ ऑगस्ट रोजी झाले होते. त्यानंतर मायाचे दर्शन झाले नाही. त्यामुळे १२५ कॅमेरा ट्रॅप लावून तिचा शोध घेतला जात आहे.
“माया” या वाघिणीला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची क्विन अर्थात राणी म्हणून ओळखले जाते. २०१० मध्ये जन्मलेल्या या वाघिणीने अनेक बछड्यांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना ती बछड्यांनसोबत जंगलात भ्रमंती करतानाच दिसली आहे. तिला बघण्यासाठी पर्यटक देखील ताडोबात येतात. ताडोबात सर्वात प्रसिद्ध वाघीण “माया” आहे. माया य वाघिणीचे अखेरचे दर्शन २३ ऑगस्ट रोजी झाले होते. जवळपास ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला माया कुणालाही दिसलेली नाही. १ ऑक्टोंबर पासून ताडोबा गाभा परिसरात पर्यटन सुरू झाले आहे.
हेही वाचा >>> “विजय वडेट्टीवार पक्षांतर करणार…”; भाजपचे आशिष देशमुख यांचा दावा
मात्र तरीही मायाचे दर्शन पर्यटक तथा ताडोबाच्या अधिकाऱ्यांना झाले नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता मायाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने १२५ कॅमेरा ट्रॅप लावले आहे. अधिकारी व कर्मचारी देखील मायाचा शोध घेत आहे. ताडोबाचे प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना विचारले असता, सदर माहिती चुकीची असे सांगितले. १ ऑक्टोबर रोजी ताडोबा प्रकल्प पर्यटनासाठी उघडले आहे. पर्यटकांना कोणताही विशिष्ट वाघ दिसण्याची हमी कोणीही देऊ शकत नाही असे ते म्हणाले. विशेष म्हणजे वाघिणीच्या हल्ल्यात वन कर्मचारी स्वाती दुमणे हीचा मृत्यु झाला होता. तेव्हाही माया ही वाघीण चर्चेत आली होती.