नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघाची वाट अडवण्याच्या प्रकरणाला आठवडा देखील संपत नाही तोच पुन्हा एकदा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती बफर क्षेत्रात झाली आहे. विशेष म्हणजे, या बफर क्षेत्रातून राज्य महामार्ग जात असून सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून जाण्याची परवानगी आहे. मात्र, त्याठिकाणी वाघ असल्याने पर्यटक वाहनांनीच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र तेथून हुसकावून लावले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात काला-पाणी क्षेत्रात सफारीदरम्यान व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. पदमापूर-मोहर्ली या राज्य महामार्ग ३७१वर दोन्ही बाजूने पर्यटक वाहनांच्या रांगा लागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर अडथळा निर्माण झाला. नागरिकांनी त्यांची वाट मोकळी करून मागितली तेव्हा पर्यटक मार्गदर्शकांनी तुम्हाला येथून जाण्याचा अधिकार नाही. येथे फक्त पर्यटकांचीच वाहने थांबू शकतात, असा वाद घातला. नुकतेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघाची वाट अडवून ठेवण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. पर्यटक वाहने व मार्गदर्शकांवर कारवाई करण्यात आली. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी बफर क्षेत्रात सुद्धा वाघ बघण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने पर्यटक वाहने लावण्यात आली. यामुळे या महामार्गावरून जाणेयेणे करणाऱ्यांसाठी अडथळा तर निर्माण झालाच, पण वाघाची वाट पुन्हा अडवण्याच्या गंभीर प्रकारची पुनरावृत्ती होते की काय, अशी परिस्थती निर्माण झाली होती.

Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?

हेही वाचा : भंडाऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाच जणांवर उपचार सुरू

मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी पर्यटक वाहनातील मार्गदर्शक व चालक यांना तुम्ही सामान्य नागरिकांना का त्रास देत आहे, म्हणून खडेबोल सुनावले. ह्या प्रकरणाची माहिती मोहर्लीतील वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांना दिली. हा राज्य महामार्ग ३७१ असून सामान्य नागरिकांचा तो जाण्यायेण्याचा रस्ता आहे. पर्यटक मार्गदर्शक, चालक व पर्यटक कसे काय धमकी देऊ शकतात, अशी तक्रारही त्यांनी दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांनी मी त्यांना समजावून सांगतो असे सांगितले.

नियमांचा भंग

पदमापूर-मोहर्ली या राज्य महामार्ग ३७१ वर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सूचना फलक लावण्यात आला आहे. सदर क्षेत्र राखीव वन असून अतिसंवेदनशील आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर असतो. याठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहन थांबवणे व वाहनाखाली उतरून वन्यप्राण्यांस त्रास देणे भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या नियमाचा भंग आहे. त्यामुळे पर्यटक, गावकरी, प्रवासी यांनी थांबू नये अथवा वाहनाखाली उतरू नये. अन्यथा भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट लिहिले आहे.

हेही वाचा : “यवतमाळ-वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या”, उच्च न्यायालयात याचिका; आक्षेप काय? जाणून घ्या…

याठिकाणी लावण्यात आलेल्या सूचना फलकातील सूचना फक्त सामान्य नागरिकांनाच लागू होतात का? ह्या रस्त्यावर वनविभाग अधिकार गाजवत आहे. हा रस्ता राज्य महामार्ग ३७१ असताना वनविभाग येथे अधिकार का गाजवत आहे. ही कसली हुकूमशाही वनविभागाने सुरू केली. पर्यटकांना सोडून सामान्य नागरिकांना त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे राज्य महामार्ग ३७१ वर पर्यटक वाहने थांबलेली दिसल्यास ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पर्यटन बंद पाडू.

मनदीप रोडे, जिल्हाध्यक्ष मनसे

Story img Loader