लोकसत्ता वार्ताहर

चंद्रपूर : ताडोबा ऑनलाईन बुकींग मधील १२ कोटींपेक्षा अधिकच्या अपहार प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने ताडोबाचे उपसंचालक तथा ऑनलाईन बुकिंग प्रकरणाश संबंधित अधिकान्यांचे तीन ते चार महिन्यांपूर्वीच बयान नोंदविले आहे. त्यानंतरच चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या कंपनीचे संचालक रोहित विनोदसिंह उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोदसिंह उर्फ बबलु ठाकूर यांच्या निवासस्थानी व प्रतिष्ठानांवर छापे घालण्याति आले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबातील ऑनलाईन बुकींग मधील अपहार उघडकीस आल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी ठाकूर बंधुंवर गुन्हे दाखल होवून त्यांना अटकही झाली होती. तसेच डॉ.रामगावकर यांनी या प्रकरणाची सक्त वसूली संचालनालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच ईडीच्या पथकाने या संपूर्ण घोटाळ्याची माहिती जाणून घेतली. चौकशी केली व ताडोबाचे उपसंचालक तसेच ऑनलाईन बुकींगशी संबंधित ताडोबातील सर्व अधिकाऱ्यांचे बयान तीन ते चार महिन्यांपहिलेच नोंदवून घेतले होते. बुधवारी ईडीचे पथक चंद्रपुरात आले तेव्हा केवळ ठाकूर बंधू यांच्या निवासस्थान व प्रतिष्ठानांवर छापे टाकण्यात आले.

आणखी वाचा-मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

यासंदर्भात ताडोबाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांना विचारले असता, तीन ते चार महिन्यांपूर्वीच ईडीने उपसंचालक तथा अन्य अधिकाऱ्यांचे बयान नोंदविले असे सांगितले. विशेष म्हणजे सक्तवसूली संचालनालयच्या (ईडी) छापा मारल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन बुकींग प्रकरण पून्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ठाकूर बंधु यांच्याकडून अद्यापही पूर्ण रक्कम जमा करण्यात आलेली नाही. ही रक्कम ठाकूर यांनी जमा करावी यासाठी न्यायालयानेच सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वात समिती गठीत केली आहे. ही समितीच आता संपूर्ण रक्कम वसूल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ठाकूर यांच्या निवासस्थानी व प्रतिष्ठानांवर बुधवारी सायंकाळ पर्यत कागदपत्रांची तपासणी सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिले.

आणखी वाचा-निमंत्रण पत्रिकेमध्ये शेवटी नाव…. अपमान झाल्याने मुनगंटीवारांनी फडणवीसांच्या…..

घोटाळ्याची पार्श्वभूमी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशन व रोहित व अभिषेक ठाकूर संचालक असलेल्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या कंपनीत करार झाला होता. या करारानुसार ऑनलाईन बुकींगचे सर्व पर्यटकांचे पैसे ठाकूर यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा होत होते. या खात्यातून ताडोबातील जिप्सी, गाईड तथा इतर सर्वांना ठाकूर यांना नियमित पैसे द्यायचे होते. मात्र ठाकू यांनी पैसे दिले नाही. ठाकूर यांच्या खात्यात जवळपास २२ कोटी ८० लाख रूपये जमा झाले. यातील केवळ १० कोटी ६५ लाख रूपये ठाकूर यांनी जमा केले. उर्वरीत रकमेचा अपहार केला. हा अपहार लेखापरिक्षणात उघडकीस आला. त्यानंतर तेव्हाचे ताडोबा कोरचे उपसंचालक नंदकुमार काळे व संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर प्रकरण २०२३ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी डॉ. रामगावकर यांच्या तक्रारीवरून. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी रोहित व अभिषेक ठाकूर या दोन्ही भावंडांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिल पर्यंत दोघेही पोलीस कोठडीत होते.

Story img Loader