लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची व्याघ्र सफारी व पर्यटन आता पर्यटकांसाठी महागडे झाले आहे. ताडोबाच्या कोअर झोनमध्ये व्याघ्र पर्यटन सफारी बुकींग करणाऱ्या पर्यटकांसाठी २०० अतिरिक्त शुल्कवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्या बदल्यात बुकिंग करणाऱ्या ६ पर्यटकांना विसापूर येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
lonar lake flamingos marathi news
Video : ‘फ्लेमिंगो’ला आवडले लोणार सरोवर
mumbai city Only two beaches out of 12 safe
धोक्याची किनार! दादर, माहीम, आक्सा, मनोरी, गोराई, मार्वेचा समुद्रकिनारा असुरक्षित
Mumbai Boat Accident
Elephanta Caves: घारापुरी (एलिफंटा) लेणींना एवढे महत्त्व का? हजारो पर्यटक त्यांना रोज भेट का देतात?
Devendra fadnavis
चंद्रपूर : मुनगंटीवार समर्थक मुख्यमंत्री फडणवीसांच्या द्वारी, मंत्रिमंडळातील समावेशासाठी…
dog attack mira road
मिरा रोड येथे पिसाळलेल्या श्वानाचा लहान मुलावर जीवघेणा हल्ला

ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोनमधील प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. यामध्ये प्रति वाहन २०० रूपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करतांना या पर्यटकांना विसापूर येथे नव्याने बनलेले बॉटनिकल गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे काही पर्यटक नाराज आहेत.

आणखी वाचा-Gondia crime update : चुलबंद जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

२०० रूपये शुल्क वाढीने ताडोबाला वर्षभरात १.८० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. या उत्पनातून बोटॅनिकल गार्डनच्या देखभाल, दुरूस्ती केली जाणार असल्याचा आरोप पर्यटक करत आहेत. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी प्रवेश शुल्क वाढ केल्याचे मान्य केले. मात्र, या शुल्क वाढीचा बोटॅनिकल गार्डनच्या देखभाल, दुरूस्तीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला परदेशी पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दुप्पट करायचे होते. मात्र, राज्य शासनाकडून परवानगी मिळाली नाही. शासनाला दिलेल्या माहितीत बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रवेश मोफत असेल असे नमूद केले आहे. त्याचा उद्देश फक्त बोटॅनिकल गार्डनचा प्रचार करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-कंत्राटी वीज कामगारांचा संपाचा इशारा, यंत्रणा कोलमडण्याचा धोका

अतिरिक्त उत्पन्न मिळणार

ताडोबामध्ये १२५ वाहनांना परवानगी आहे. सकाळ व दुपारच्या सत्रात एकूण २५० वाहनांना परवानगी दिली जाते. प्रतिवाहन २०० रूपये वाढविण्यात आल्याने प्रतिदिवस ५० हजार रूपये आणि दरमहा १५ लाख व वर्षांला १.८० कोटी रूपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

Story img Loader