वर्धा: पावसाळा म्हणजे रोगांना आमंत्रण असे म्हटल्या जाते. म्हणून मनुष्यांनाच नव्हे तर प्राण्यांनाही बाधा चटकन होते. त्यातही पाळीव प्राण्यांची तर विशेष काळजी क्रमप्राप्त ठरते. उन्हाळा व लगेच पावसाने थंड पडणारे वातावरण पाळीव प्राण्यांना घातक ठरू शकते, असे मत पेट केअर हॉस्पिटलचे डॉ.अनिल चौधरी सांगतात. श्र्वानांमध्ये व्हायरल व्याधी पसरतात. उलटी, पातळ जुलाब व कधी तर रक्ताचे जुलाब होतात. त्यात श्वान दगावत असल्याने लसीकरण करणे आवश्यक ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोंदणीकृत पशू वैद्यकीय दवाखान्यात ते करून घ्यावे. त्वचेचे आजार फोफावतात. त्वचा आजार झाल्यास श्वान अस्वस्थ होतो.वास सुटतो. म्हणून त्वचा कोरडी ठेवावी. सारखा ओला होत असल्यास श्वसन विकार बळावतात. कोरडा खोकला व घश्यात काही अडकल्याची भावना असते. त्यावर लस उपलब्ध असते.

हेही वाचा…. नागपूर ‘एम्स’मध्ये रुग्णांना लुटण्याची नवीन क्लुप्ती, प्रकरण काय?

हवेतून पसरणाऱ्या जंतू मुळे हे श्वसन विकार पाळीव प्राण्यांना होतात.परजीवी पिसू,गोचीड या किड्यापासून रक्त संसर्ग आजार होतात. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी गोळ्या व त्वचेवर लावण्यास मलम उपलब्ध आहेत.आहारात बदल करू नये. वर्षभर असणारच पावसाळ्यात पण ठेवावा,असे डॉ. चौधरी स्पष्ट करतात. त्वचा कोरडी ठेवावा. पाय व बोटे पुसून काढावी.या दिवसात आपला ‘ टॉमी ‘ सुरक्षित रहावा, असे वाटत असेल तर काळजी घेतलीच पाहिजे, असा सल्ला मिळतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of your pets during monsoons pmd 64 dvr