वर्धा : विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची राज्यातील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून सुरू झाली आहे.अर्ज दाखल केल्या जात आहे.मात्र अर्ज भरतांना चुका झाल्यास तो नामंजूर होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर सेल कडून काही सूचना करण्यात आल्या आहेत.प्रथम तर शक्यतो अर्ज विद्यार्थ्यांनीच करावा.त्रयस्थ व्यक्ती, सायबर कॅफे मार्फत अर्ज भरण्याची गरज पडल्यास नाव,मोबाईल क्रमांक व अन्य माहिती अचूक भरल्याची खात्री करावी.
ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्या अभ्यासक्रमाच्या लिंकला भेट देवून उमेदवारांनी प्रक्रियेचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका वाचून घ्यावी.सीईटी सेलकडून अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या वर्षापासून ऑनलाईन ॲप उपलब्ध करून देण्यात येत आहे.आपण सादर केलेला अर्ज ऑनलाईन अर्ज ई पडताळणी केंद्रामार्फत तपासल्या गेला अथवा नाही याची खात्री करावी.अर्ज अपूर्ण राहणे, चुकीच्या अभ्यासक्रमासाठी तो भरल्या जाणे,कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने अर्ज नामंजूर होणे, अश्या बाबी टाळता येतील.