नागपूर : तलाठी भरतीची परीक्षा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून रोज नवनवीन गोंधळ समोर येत आहेत. सोमवारी अनेक परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन असल्याने गोंधळ उडाला होता. तर मंगळवारी वर्धा येथील एका परीक्षा केंद्रावर चक्क त्या परीक्षा केंद्राचा मालकच संशयाच्या भूमिकेत आढळून आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या केंद्रावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तानिया कम्पुटर लॅब या परीक्षा केंद्राचा मालक परीक्षा सुरू असताना त्याचा लॅपटॉप बाहेर घेऊन आला. यावर उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर, आत मोबाईल जॅमर असल्याने नेटवर्क नसल्याने मी बाहेर पेपर डाऊनलोड करण्यासाठी गेलो होतो, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय उपस्थित होत आहे. तो परीक्षार्थी नसल्याने त्याला प्रश्नपत्रिकेची गरज काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा – सुखी संसाराचे स्वप्न; अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे पलायन, दोन दिवसांत उघडले डोळे

हेही वाचा – नागपूर : पाकिस्तानी ध्वज अन् मनसचे खळ्ळखट्याक! ॲमेझाॅनच्या कार्यालयात तोडफोड

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सांगितले की, आजवर आम्ही इतके पेपर दिले पण आम्हाला कधी कोणीही लॅपटॉप बाहेर घेऊन जाताना दिसले नाही. पेपर लॉगिनमध्ये उपलब्ध असतो. जर कर्मचाऱ्याने पेपर बाहेर डाऊनलोड केला असेल तर त्याने बाहेरच्या-बाहेर कोणाला पाठविला नसेल कशावरून म्हणता येईल, अशी शंका घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talathi bharti when the examination was going on in wardha the owner of the exam center took the laptop outside dag 87 ssb