वर्धा : आजपासून तलाठी भरतीची बहुचर्चित परीक्षा सुरू झाली आहे. तीन टप्प्यांत होणाऱ्या या परीक्षेचा पहिला टप्पा आज विविध केंद्रांवर पार पाडत आहे. मात्र यासाठी खास दक्षता घेतल्या जात आहेत.
परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीकडे आहे. मात्र प्रशासनपण सतर्क आहे. परीक्षेत विविध मार्गाने गैरप्रकार घडण्याचे प्रकार यापूर्वी चर्चेत राहिले. त्यात प्रामुख्याने कानात सूक्ष्म ब्ल्यूटूथ यंत्र लपवून ठेवल्या जाण्याची बाब आहे. त्या माध्यमातून उत्तरे प्राप्त केल्या जातात. सूक्ष्म स्वरुपातील हे यंत्र सहज दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने खास कान नाक घसा तज्ञाला पाचारण केले आहे.
हेही वाचा – ॲड. उकेंसह कुटुंबीयांविरुद्ध मोक्का, फडणवीसांच्या विरोधात दाखल केली होती याचिका
या माध्यमातून कॉपी होत असल्याची बाब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एका व्हिडीओतून तपासली होती. त्यामुळे थेट तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी सुरू असल्याचे मत एका अधिकाऱ्याने नमूद केले. सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाचे दोन डॉक्टर यासाठी तैनात आहे. सकाळी साडेसात वाजता परीक्षार्थी केंद्रावर आल्यानंतर तपासणी झाली.