नागपूर : पहिल्याच दिवशी पेपरफुटीच्या घटनेने गाजलेली तलाठी पदभरतीची परीक्षा काहीसी रुळावर आली होती. मात्र, सोमवारी तिसऱ्या पाळीमध्ये हायटेक उपकरणांसह पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला अमरावती येथे अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी परीक्षा केंद्रात असणाऱ्या अन्य उमेदवारांनी सांगितले की, परीक्षा सुरू झाल्याच्या एका तासानंतर या उमेदवाराला पोलिसांनी पकडले. मात्र, पोलिसांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्याआधी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाच त्याला पकडण्यात आले. माधव इन्फोटेक अमावती ड्रेमलॅड मार्केट असे या परीक्षा केंद्राचे नाव आहे. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार आत बसून गैरप्रकार करत होता, तर पोलीस याउलट उत्तर देत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा – Maratha Arakshan Andolan: तीन दिवसांत एसटीला ५.२५ कोटींचा फटका, ४६ आगार पूर्णत: बंद, २० बसेस जाळल्या तर १९ बसेसची मोडतोड

हेही वाचा – अखेर एमपीएससीकडून बहूप्रतिक्षित संयुक्त परीक्षेचा निकाल जाहीर, अर्हताप्राप्त उमेदवारांना आता…..

नांदगाव पेठ पोलीस स्टेशन, अमरावती येथे पोलिसांकडून सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून, महसूल विभागाअंतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. परंतु, परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान होणाऱ्या विविध गोंधळ आणि गलथान कारभारामुळे ही परीक्षा चांगलीच चर्चेत राहिली आहे. अमरावतीमध्ये गैरप्रकार करणारा उमेदवार पकडण्यात आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talathi recruitment one arrested from amravati exam center with hi tech equipment dag 87 ssb
Show comments