देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : महसूल विभागाच्या तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिकलठाणातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केली होती. आता संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक विभागाला सोपवले आहे. आरोपपत्रानुसार नागपूरमधून प्रश्नपत्रिका भ्रमणध्वनीद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झाले आहे.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी

सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. आता खुद्द पोलीस विभागाच्या आरोपपत्रामध्ये नागपूरच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्न पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर फुटला हे निश्चित झाले आहे. संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरून राजू भीमराव नागरे या आरोपीला परीक्षार्थींना उत्तरे पुरवताना अटक करण्यात आली होती.

आणखी वाचा-यवतमाळ : खळबळजनक! एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी ही कारवाई केली. त्यांनी केलेल्या तपासामधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्या आरोपपत्रानुसार व्हीएमव्ही महाविद्यालय वर्धमाननगर नागपूर येथे परीक्षेत बसलेला परीक्षार्थी अंकुश जाधव सकाळी ९ ते ११ वाजता परीक्षा देत होता. यावेळी त्याने मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केला आहे. संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांनी त्यांचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक तसेच अप्पर जमावबंदी आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे आता परीक्षा विभाग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोपपत्रावरून पेपर फुटला हे निश्चित आहे. मात्र नागपूरमधून पाठवण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही केवळ संभाजीनगर येथील एकाच केंद्रावर आली ही अन्य केंद्रावरही गेली याचा शोध होणे आवश्यक आहे. पेपरफुटीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी. -राहुल कवठेकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.