नागपूर : पाण्याचा टँकर घेऊन आलेल्या चालकाने पाणी भरणाऱ्या मुलीशी अश्लील चाळे करीत तिला १०० रुपये देऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. ही बाब कळताच वस्तीतील नागरिकांनी चालकाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय घोडे (४३, एकात्मतानगर, जयताळा) असे आरोपी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परीसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी दहावीत शिकते. तिच्या वस्तीत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. टॅकरसाठी लोकांना पैसे द्यावे लागते. घटनेच्या दिवशी मुलीच्या आईने तिला ३०० रुपये दिले व टँकरचालक विजय घोडे याला देण्यास सांगितले.

हेही वाचा – गोंदिया : रस्ते खडीकरणाच्या श्रेयावरून आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ; एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन

हेही वाचा – बुलढाणा : सावकाराने इतके छळले की, शेतकऱ्याने आत्महत्या केली; कुटुंबाने रुग्णालयात ठिय्या दिल्यावर गुन्हा दाखल

शनिवारी सकाळी आठ वाजता विजय घोडे टँकर घेऊन घरी आला. तो पाणी भरत असलेल्या मुलीच्या पाठीमागे घरात गेला. तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने प्रतिकार केला. पाणी भरून झाल्यानंतर तिने ३०० रुपये दिले. त्याने १०० रुपये मुलीला दिले. ‘उद्या एकटी घरी असल्यावर मी येईल, असे सांगून तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने लगेच आईला ही माहिती दिली. शेजारी जमले आणि विजयला चांगला चोप दिला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.