नागपूर: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या धर्तीवर मंगळवारी उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही निवडक उमेदवारांसोबत बैठक घेतली. यावेळी इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

हेही वाचा >>> पंतप्रधानांपाठोपाठ राष्ट्रपतींनीही नाकारले भारतीय विज्ञान काँग्रेसच्या समारोपाचे निमंत्रण

हेही वाचा >>> मोदींमुळेच विज्ञान प्रगतिपथावर! राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचाही सूर

 भाजप मधून यावेळी नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत उत्सूकता आहे. भाजप शिक्षक आघाडीचे अनिल शिवणकर आणि माजी महापौर व शिक्षण मंचाच्या प्रमुख डॉ. कल्पना पांडे यांनीही भाजपकडून उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांनी बैठकीला हजेरी लावल्याचे माहिती आहे. गाणार यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने भाजपशी सल्लामसलत न करता यापूर्वीच जाहीर केल्याने भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कुणाला भाजप शिक्षक मतदारसंघात कुणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader