नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सोमवार सकाळी आठ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समवेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तेथील नक्षलवांद्यांच्या हालचाली लक्षात घेता प्रशासन काळजीत असते. मात्र ‘शिक्षक’च्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बाहेर पडू लागले असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते ९ या दोन तासात १२.८६ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा – राष्ट्रीय महामार्गावरील काळविटांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?
नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयोगाने सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत मतदानाची वेळ केली आहे. या ठिकाणचे मतदान तीन वाजता संपेल. नागपुरातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील ४५ केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे.