लोकसत्ता टीम

यवतमाळ: सामान्य माणूस छोट्याछोट्या वैयक्तिक कारणांसाठी अनेक महत्त्वाच्या दैनंदिन गोष्टी टाळतो. मात्र लग्नासारखा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण येऊन ठेपला असताना मेहंदी लावलेल्या हातांनी एक तरुणी चक्क श्रमदानास पोहचली. हे कुठल्या चित्रपटातील दृश्य नसून यवतमाळ येथे घडलेली घटना आहे.

Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj
‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…

यवतमाळ येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वाघाडी नदी सेवाकार्य सुरू आहे. योग शिक्षिका मीनाक्षी ढोबळे या सेवाकार्यात कायम सहभागी असतात. त्या बालसंस्कार वर्गही चालवितात. शक्य त्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. रविवार, ८ मे रोजी त्यांचा विवाह होता. विवाहाच्या दिवशीच हळदी आणि परंपरेनुसारचे कार्यक्रम असताना प्रत्येक रविवारी ठरल्याप्रमाणे सकाळी त्यांनी वाघाडी येथे येऊन श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. अगदी सकाळी साडेसातपासूनच त्यांनी वाघाडी येथे आपले माहेर व सासरच्या कुटुंबियांसह हजेरी लावून प्रत्यक्ष स्वच्छताकार्य केले. पारंपरिक विवाहातील काही कुप्रथा त्यांनी आवर्जून टाळल्या.

हेही वाचा… वाशीममध्ये खासगी बस जळून खाक; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ११ विधवा महिला शेतकऱ्यांच्या हातून बांगड्या भरवून समान स्त्री स्वातंत्राचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. सेवाधर्माचे बाळकडू अंगात भिनले असेल तर श्रमसंस्काराचे मोती आपल्या शब्दातून नव्हे तर कृतीतून दिसतात. मीनाक्षी या सुद्धा स्वतःच्या लग्नाचे कारण देऊ शकल्या असत्या. मात्र त्यांनी ते टाळत सातत्याचा एक आदर्श परिपाठ आपल्या कृतीतून सामाजिक कार्यकर्त्यांना घालून दिला.

हेही वाचा… वर्धा : लक्षावधी रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्त, पान मसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

लग्नाचा जोडा घालून केवळ औपचारिक श्रमदान नाही, तर अगदी श्रमदानाकरिताचे नियमीत कपडे परिधान करुन ढोबळे आणि खत्री कुटुंब उपस्थित होते. श्रमदानानंतर मीनाक्षी व अभिजित लक्ष्मणलाल खत्री यांनी जोडीने आपल्या विवाहाची साक्ष म्हणून रामफळ आणि सीताफळ असे दोन वृक्ष लावून उपस्थितांचे आर्शीवादही घेतले. सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात मीनाक्षी व अभिजित यांचा विवाह थोरामोठ्यांच्या उपस्थितीत पार पडला. मीनाक्षी यांच्या या कृतीचे सामाजिक क्षेत्रात कौतुक होत आहे.

Story img Loader