वर्धा : शालेय शिक्षण विभागाची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवारांना नोंदणी करतानाच स्वप्रमाणपत्र भरायचे आहे. पण हे करीत असताना एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. म्हणून विभागाने काही खबरदारी सुचविली आहे. ‘महा टीचर रिकृटमेंट’ या संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

पहिली खबरदारी म्हणजे नोंदणी करताना आपला टेट २०२२ चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक दाखल करावा. हा रोल नंबर हाच त्यांचा लॉग इन आयडी असेल. पवित्र पोर्टलची नोंदणी तसेच स्व प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया स्वतः करायची आहे. अर्ज मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र नोंदणीसाठी आवश्यक माहिती इंग्रजीत कॅपिटल लेटरमध्ये भरावी. संक्षिप्त नको. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत असलेली माहिती दिलेल्या क्रमाने भरावी. या पात्रतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणास्तव राखून ठेवला असेल व असा राखून ठेवलेला निकाल १२ फेब्रुवारी २०२३ नंतर जाहीर झाला असेल तर अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत पात्रता धारण केली असे म्हटल्या जाणार नाही. पत्र व्यवहाराचा पत्ता इंग्रजीत अचूक टाकावा. उमेदवाराने वय, पात्रता, आरक्षण तसेच अन्य गटवारीबाबत न चुकता निर्विवाद दावा करणे आवश्यक आहे. अर्जात तसा दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केल्या जाणार नाही.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
man arrested with 13 kg of charas and weapons by powai police
मुंबईतून अमलीपदार्थ आणि शस्त्रांचा साठा जप्त; साडेतीन कोटींच्या मुद्देमालासह पवईतून एकाला अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Satara District Sessions Judge detained for questioning in attempt to take bribe
लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
What is dispute over historic Durgadi Fort and what did court say while handing over fort to government
ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा वाद काय आहे? त्यावर मुस्लिमांचा दावा कसा? किल्ला सरकारच्या ताब्यात देताना न्यायालयाने काय म्हटले?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून

हेही वाचा – राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; विदर्भ व मराठवाड्याला ‘यलो अलर्ट’

हेही वाचा – २२ हजारावर लाभार्थी ‘किसान सन्मान’पासून वंचित; कारण काय वाचा…

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ यासाठी ऑनलाईन अर्जात उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण आदी बाबी नमूद केल्या आहेत. मात्र नव्या अधिसूचनेनुसार सद्यस्थितीत कागदपत्रे प्राप्त झाली असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षणबाबत बदल करता येवू शकतात. शेवटचे म्हणजे आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला सोडून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे असे प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही. केवळ आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Story img Loader