लोकसत्ता टीम

नागपूर : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीतून शिक्षिकेने युवकावर विश्वास ठेवला. त्याला मित्र समजून त्याच्यासोबत एका नोकरीच्या मुलाखतीला गेली. मात्र, त्याने विश्वासाचा गैरफायदा घेत शिक्षिकेच्या शितपेयात गुंगीकारक औषधी मिसळून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शुद्धीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मित्राविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

कृणाल गजबे (३०) रा. दाभा असे त्या आरोपीचे नाव आहे. तो इंदोरच्या एका कंपनीत काम करतो. तर पीडित युवती उच्चशिक्षित असून एका शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून नोकरी करते. सोबतच ती शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील होती. दरम्यान २०१८ मध्ये कृणालने तिच्याशी फेसबुकवर मैत्री केली. ओळख वाढत गेल्याने दोघांनीही एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि संवाद सुरू झाला. कृणालने मोठमोठ्या गोष्टी सांगितल्याने पीडित शिक्षिकेचा त्याच्यावर विश्वास बसला.

आणखी वाचा- “मौसम टूटना नहीं चाहिए, विकास…” मुनगंटीवार असं का म्हणाले?

दरम्यान शासकीय नोकरी लावून देण्याची सुध्दा त्याने बतावणी केली. पीडितेचा विश्वास पुन्हा बळावला. तेव्हा तो औरंगाबदला नोकरी करीत होता. त्याने मुलाखतीला जायच्या नावाखाली तिला औरंगाबदला बोलाविले. नोकरी मिळत असल्याने ती सुध्दा कुठलाच विचार न करता औरंगाबादला गेली. तो तिला लोणावळा येथे घेऊन गेला. शितपेयात गुंगीचे औषधी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याने मोबाईलमध्ये काही छायाचित्रही काढले होते. तो अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण करीत होता.

त्याने तिला औरंगाबादला राहायला बाध्य केले. आता नोकरीचा प्रश्न नव्हे तर तिच्यासमोर आयुष्याचा प्रश्न उभा झाला होता. नंतर त्याने इंदोरच्या कंपनीत काम सुरू केले. तिथे सुध्दा तो तरुणीला घेऊन गेला. मागील पाच वर्षापासून तिला पत्नीसारखे ठेवल्यानंतर चक्क लग्नासाठी नकार दिला. या प्रकाराने व्यथीत झालेल्या तरुणीने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी कृणाल विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत.