लोकसत्ता टीम

नागपूर: सभागृहात बोलण्याची संधी मिळावी म्हणून एकाच वेळी अनेक शिक्षक आमदारांनी मागणी केल्याने विधान परिषदेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पीठासीन अधिकारी डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतरही स्थिती कायम कायम राहिल्याने. ”विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक (आमदार) अधिक बेशिस्त! ” अशा शब्दांत उपसभापतींनी शिक्षक आमदाराना समज दिली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा-लसणाचे दर कडाडले, गृहिणींचे किचन बजेट गडबडले! गोंदियात किरकोळ बाजारात ३२० ते ३५० रुपये दर

विधानपरिषदेत राष्ट्रवादीचे( अजित पवार) विक्रम काळे यांनी शिक्षकांचा प्रश्न मांडला. त्यावर कपील पाटील यांनी मुद्दा मांडला. मंत्र्यांनी या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिले. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा बरीच लांबली. तरीही एकामागून एक शिक्षक सदस्य बोलण्याची संधी मागत होते. प्रश्नावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आता अधिक नको, इतर प्रश्न महत्त्वाचे आहे, असे उपसभापती यांनी सांगितले. मात्र, सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी बोलण्याचा आग्रह कायम ठेवला. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर उपसभापतींना विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकच अधिक बेशिस्त अशा शब्दांत समज दिली.

Story img Loader