अमरावती : दिवाळी हा महत्वाचा सण असल्यामुळे ऑक्टोबर महिन्‍याचे वेतन दिवाळी पूर्वी मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी ९ ऑक्टोबरला शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांना निवेदन सादर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मागणीची दखल घेत शासनाने निधीची तरतूद करुन सर्व जिल्हा परीषदांना निधी पाठविला होता, तर आज सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन २५ ऑक्टोबरला वेतन करण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, पण दर वर्षाला सणानिमित्य सण अग्रिम मिळत असतो, त्‍याचे शासन आदेश अजूनही आलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्‍ये थोडी नाराजी आहे, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.

हेही वाचा…‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; ऐन सणासुदीत प्रवासी गाड्या रद्द

u

३१ ऑक्टोबर २०२४ रोजी देय ठरणारे ऑक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन २५ ऑक्टोबर पूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम ३२८ आणि नियम ३२९ मधील तरतुदी शिथील करण्यात येत आहेत. माहे ऑक्टोबरच्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान २५ ऑक्टोबर पूर्वी होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके आणि निवृत्तिवेतन देयके त्वरीत लेखा कार्यालय, संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय, उप कोषागार कार्यालय येथे सादर करावीत.

सदर निर्णय जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालये यांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृत्तिवेतनधारक यांना देखील लागू होईल. ऑक्टोबरच्या वेतनाचे आणि निवृत्तिवेतनाचे प्रदान २५ ऑक्टोबर पूर्वी होण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उप कोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात, असे आदेश शासनाचे उप सचिव डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी दिले आहेत. राजेश सावरकर यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा…थंडीची चाहूल… राज्यात दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढणार…

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन २५ ऑक्‍टोबरला दिवाळीपुर्वी करण्‍याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्‍यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आनंद व्‍यक्‍त केला असला, तरी सण अग्रिमाचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers committee submitted memorandum on october 9 to get october salary before diwali mma 73 sud 02