विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण सहा जिल्ह्यात दुपारी १२ पर्यंत ३४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान चंद्रपूर जिल्ह्यात४२.१९ टक्के तर सर्वाधिक मतदार असलेल्या नागपूरजिल्ह्यात२९.८२ टटक्के मतदान झाले.विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदान शांततेत सुरु असून दुपारी १२.०० वाजेपर्यंत सर्व जिल्हयांमध्ये सरासरी ३४.७0 टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>अकोला: आजीला अल्पवयीन नातीच्या पाठीवर दिसल्या जखमा, विचारपूस करताच कुटुंबीय हादरले…

या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ३५.६६ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारी १२.०० वाजेपर्यंत २९.८२ टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात ३६.४८ टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात ३१.८७ टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात ३९.८० टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ४२.१९ टक्के मतदान झाले आहे.

जिल्हा निहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर : २९.८२ टक्के

वर्धा : ३९.८० टक्के

चंद्रपूर :. ४२.१९ टक्के

भंडारा :. ३६.४८ टक्के

गोंदिया :. ३१.८७ टक्के

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers constituency 34 percent polling till 12 noon cwb 76 amy