नागपूर : शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक शिक्षक आमदारांना शिक्षकांच्या प्रश्नाव्यतिरिक्त बिल्डरांचा प्रश्नात रस असतो, मात्र नागो गाणार यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण क्षेत्रातील प्रश्न लावून धरले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप समर्थित महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबागेतील स्मृती भवनमध्ये पूर्व विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्याचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेढे, उपेंद्र कोठेकर, अशोक नेते, अनिल सोले, कल्पना पांडे, प्रवीण दटके आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्या, डॉ. नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षात शिक्षक आमदारांच्या निवडणुका अशा झाल्यात की, त्या निवडणुकातील गैरप्रकार पाहून लाज वाटते. काही गोष्टी सांगता येत नाही. मात्र, गाणार यांनी त्यांच्या कार्यकाळात कुठलाही गैरप्रकार न करता ते प्रामाणिकपणे मत मागून निवडून आले आहे. आता यावेळी सुद्धा शिक्षकांचे प्रश्न घेऊन निवडणूक लढणार आहे. शिक्षक दिनच्या कार्यक्रमावर गाणारांनी बहिष्कार टाकला आहे, शिक्षकांचे प्रश्न सुटत नसेल तर वेळप्रसंगी त्यांनी आमच्या विरोधात जाऊन सुद्धा भूमिका घेतली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना

काही संस्थाचालक हे गाणार यांच्यावर नाराज असतील, कारण त्यांनी संस्थाचालकांच्या विरोधात कठोर भूमिका घेत अन्यायाच्या विरोधात काम केले आहे. त्यांनी शिक्षक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचे काम केले असून कधीही बिल्डरच्या मागे लागले नाही, असे सांगत अन्य शिक्षक आमदारांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शिक्षकांच्या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेतले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीने शिक्षकांना केवळ आश्वासने दिली.

हेही वाचा >>> ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

पटसंख्या कमी असल्यास शाळा बंद करणार, अशी आघाडी सरकार असताना अफवा उडवली. पण आम्ही शाळा निश्चितपणे चालवू. एक विद्यार्थी असेल तरीही शाळा सुरू राहील असेही फडणवीस म्हणाले. शिक्षक आमदारांच्या निवडणूकीत मेळावे किंवा सभा घेऊन उमेदवार निवडून आणता येत नाही. प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन आपण पोहचले पाहिजे. मतदाराच्या याद्या तयार करून जबाबदार व्यक्ती द्या, सर्वच जिल्ह्यात काम करा. तुम्ही लढा आणि आम्ही कपडे सांभाळतो असे सांगून चालणार नाही.

विरोधकांचा उमेदवार अजुनही ठरला नाही त्यामुळे योग्य नियोजन करत शिक्षकांपर्यंत पोहचा आणि सगळ्यानी गांभीर्याने ही निवडणूक अंगावर घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात काँग्रेसचे अनेक नेते व शिक्षक प्रतिनिधी भेटले होते. शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे किंवा जुनी पेन्शनसंबंधीचा निर्णय तुम्हीच घेऊ शकतात म्हणून माझ्याशी चर्चा केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers mlas interested in the question of builders assertion by devendra fadnavis vmb 67 ysh