मोहन अटाळकर
अमरावती जिल्हा परिषदेमधील नियमबाह्य बिंदुनामावली आणि दुर्गम भागातील शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या झेंड्याखाली शेकडो शिक्षकांनी उठाबश्या काढून जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
शिक्षकांच्या नियमबाह्य बिंदूनामावलीबाबत सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बिंदुनामावलीची पुन्हा तपासणी करून, नियमानुसार बिगर पेसामधील आरक्षण अबाधित ठेवण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी दिले. परंतु या आदेशाला जिल्हा परिषद प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याने याबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शिक्षक सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडकले. यावेळी शिक्षकांनी उठाबश्या काढून जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.
“नियमबाह्य बिंदुनामावलीबाबत गेल्या तीन वर्षापासून सतत पाठपुरावा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्तांना भेटून प्रकार कथन केला. मात्र त्यांनी सकारात्मकता न दाखविल्याने मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. सामान्य प्रशासन विभागाचे बिंदुनामावली पुन्हा तपासणीचे आदेश आलेत. मात्र अद्यापही कार्यवाही नाही. कार्यवाही न झाल्यास प्रशासनाला जागे करण्यासाठी मग आम्हीही ‘भोंगे’ वाजवू,” असा इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी दिला आहे.