नागपूर : दक्षिण नागपुरात जयमाता प्रा. शाळा, दिघोरी येथे बूथ क्रमांक ४६ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मतदान केंद्रावर १ तास १० मिनिट उशिरा मतदान सुरू झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर सकाळी गर्दी झाली होती. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण नागपुरात सकाळी सात वाजता मतदान सुरू होण्याच्या आधी जय माता प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर मशीन तपासणी केली असता त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. या केंद्रावर सकाळी सात वाजेपासूनच मतदार रांगेत होते मात्र मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर नवीन मशीन आणून जवळपास एक तास उशिरा मतदान सुरू करण्यात आले. मात्र लोकांच्या केंद्रावर रांग लागली होती.

हेही वाचा…नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…

दरम्यान केंद्रावर आता मतदान सुरू झाले असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.या भागातील माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी १ तास मतदान सुरु झाल्याचा आरोप करत सायंकाळी एक तास वाढवून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical fault in evm machine delays polling by 1 hour in nagpur at jai mata school polling station near dighori vmb 67 psg